BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

722 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखनी

ग्रीनफ्रेंड्स तर्फे पर्यावरणस्नेही आकाशकंदील बनवा स्पर्धाचे आयोजन

ग्रीनफ्रेंड्स तर्फे पर्यावरणस्नेही आकाशकंदील बनवा स्पर्धाचे आयोजन

स्पर्धकांनी आकाशकंदीलद्वारा दिला हरित दिवाळीचा संदेश

 

न्यूज कट्टा ब्युरो / लाखनी, ०६ नोव्हेंबर :

 

येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे  पर्यावरणस्नेही आकाशकंदील बनवा स्पर्धा दिपावलीच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आली. यावेळी स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत हरित दिवाळीचा संदेश देणारे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूचा वापर करीत तयार केले.विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या आकर्षक आकाशकंदीलाचे कौतुक  सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ मनोज आगलावे व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने, पदाधिकारी दिनकर कालेजवार ,निसर्गमित्र पंकज भिवगडे,योगेश वंजारी,हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे,सेवानिवृत्त शिक्षक मंगल खांडेकर तसेच अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी कौतुक केले.

या स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयातून मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक चारू रमेश वैद्य हिला तर वेदांती सुभाष वंजारी व सृष्टी राजेंद्र वंजारी यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. हयस्कुल गटात गायत्री रमेश वैद्य हिला प्रथम तर एम डी एन फ्युचर स्कुलचा स्वयंम बाळकृष्ण गभने याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.संजयनगर लाखनी भागातून सहभागी झालेल्या स्पर्धकामध्ये जि प गांधी विद्यालयाचा मंथन घनश्याम चाचेरे याचा प्रथम क्रमांक तर सिद्धार्थ विद्यालय सावरी शाळेतून दर्शन भिमेश्वर धारगावेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तृतीय क्रमांक हिमांशी रविंद्र चाचेरे, कोमल तिलकचंद नान्हे,मयंक रविंद्र चाचेरे ,श्रीनय मंगल चाचेरे यांना देण्यात आला तर प्रोत्साहनपर क्रमांक यश गोपाल लांजेवार व ओंकार मंगल चाचेरे यांना प्राप्त झाला.

स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार व सेवानिवृत्त शिक्षक मंगल खांडेकर यांनी केले. स्पर्धेला सहकार्य सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ मनोज आगलावे, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य,भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी मर्यादित पतसंस्थाचे अध्यक्ष संजीव बावनकर, अशोक बिल्डकाँन चे मुख्य कार्य अभियंता रंजनकुमार सिंग ,इंजि नितेश नगरकर,शिवालय कन्स्ट्रुक्शन कंपनीचे दिपेश गौतम,सोना वॉच व इलेक्ट्रॉनिक्स ,नाना ऑप्टिकल्स व हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर यांनी सहकार्य केले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links