BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

638 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखनी

लाखनी बसस्थानकावर रंगल्या पर्यावरण संदेश देणाऱ्या रांगोळ्या

लाखनी बसस्थानकावर रंगल्या पर्यावरण संदेश देणाऱ्या रांगोळ्या

 

ग्रीनफ्रेंड्सतर्फे लागोपाठ 15 व्या वर्षी आयोजन

रांगोळीच्या माध्यमातुन दिला फटाखामुक्त व  प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश
  
न्यूज कट्टा ब्युरो / लाखनी, ०६ नोव्हेंबर :

 

येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे पर्यावरणस्नेही दिपावली साजरी करण्याच्या दृष्टीने लाखनी बसस्थानकावर पर्यावरणजागृती रांगोळी स्पर्धेचे आयोजन दिपावलीच्या पहिल्या दिवशी आयोजित केले.या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद स्पर्धकांनी देऊन प्रदूषणमुक्त, फटाखामुक्त दिवाळीचा संकल्प केला.स्पर्धेला सहकार्य  करणारे सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनीचे संचालक डॉ मनोज आगलावे  व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने व सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार आणि सेवानिवृत्त शिक्षक मंगलजी खांडेकर सर ,हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे, निसर्गमित्र पंकज भिवगडे, योगेश वंजारी यांनी  तत्पूर्वी स्पर्धकांना मार्गदर्शन करून स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला अ.भा.अंनिस जिल्हा भंडारा व नेफडो जिल्हा भंडाराचे सहकार्य लाभले.

दोन तासांच्या अवधीत सर्वच स्पर्धकांनी प्रदूषण,वन्यजीव शिकार,जंगलतोड,कारखाना प्रदूषण ,जलप्रदूषण तसेच दिवाळीच्या निमित्ताने फटाखाद्वारे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण यावर संदेशात्मक आकर्षक पर्यावरण जागृती रांगोळ्या काढल्या. इतक्या मोठ्या व आकर्षक रांगोळ्या दोन दिवस प्रवाशांचे चित्त वेधून घेत होते.पर्यावरणस्नेही रांगोळी स्पर्धेला भंडारा जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख कोमलचंद गभने,ऋषीजी वंजारी,साकोली बसआगार व्यवस्थापक गौतम शेंडे,  वाहतूक नियंत्रक डहाके व लाखनीच्या अनेक गणमान्य नागरिकांनी हजेरी लावून स्पर्धकांचे अभिनंदन केले.प्रत्येक रांगोळीजवळ ग्रीनफ्रेंड्सच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धकांचे हस्ते दिवे पेटवून पर्यावरणस्नेही दिपावलीच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या.

या पर्यावरणस्नेही रांगोळी  स्पर्धेत मनस्वी बाळकृष्ण गभने हिने काढलेल्या भव्य 'पर्यावरण दिवाळी-से नो टू फटाखा' रांगोळीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक  प्रांजल सतीश उइके हिच्या 'सेव्ह द अर्थ' से नो टू क्रॅकर्स, सेव्ह  द बर्थ 'या अत्यंत आकर्षक रांगोळीला प्राप्त झाला. तृतीय क्रमांक आचल लोकचंद राऊत हिच्या 'सेव्ह वॉटर, सेव्ह नेचर, सेव्ह फ्युचर' या रांगोळीला प्राप्त झाला.चतुर्थ क्रमांक गायत्री रमेश वैद्य 'ग्रीन इंडिया क्लीन इंडिया'  या रांगोळीला प्राप्त झाला.पाचवा क्रमांक साहिल विजय युवनाते याच्या 'सेव्ह ट्री' या रांगोळीला प्राप्त झाला.उत्तेजनार्थ पुरस्कार मंथन चाचेरे व ओंकार चाचेरे तसेच मनीषा काडगाये यांच्या रांगोळीला प्राप्त झाला तर प्रोत्साहनपर क्रमांक राशी मांढरे ,कोमल नान्हे,हिमांशी चाचेरे व रोहित कुंभरे यांना प्राप्त झाला.स्पर्धेचे परीक्षण ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी प्रा.अशोक गायधने, कलाशिक्षक दिनकर कालेजवार,मंगलजी खांडेकर,दिलीपजी भैसारे, निसर्गमित्र पंकज भिवगडे,योगेश वंजारी यांनी केले.

पर्यावरणस्नेही रांगोळीला यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ मनोज आगलावे,अशोका बिल्डकॉनचे मुख्य कार्य. अभियंता रंजनकुमार सिंग , इंजि. नितेश नगरीकर, भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक मर्यादित पतसंस्थाचे संजीव बावनकर,नाना वाघाये,सोना इलेक्ट्रॉनिकस, ओम आगलावे, आराध्या आगलावे,ओंकार चाचेरे,साकोली आगार प्रमुख गौतम शेंडे, अशोक वैद्य ,शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुख्य अभियंता दीपेश गौतम,राणी लक्ष्मी शाळेच्या हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर इ.नी अथक परिश्रम घेतले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links