BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

743 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

विद्यार्थ्यांना किल्ले बनविण्यासाठी जेष्ठांनी सहकार्य करावे - मोहन दाढी

विद्यार्थ्यांना किल्ले बनविण्यासाठी ज्येष्ठांनी सहकार्य करावे - मोहन दाढी

न्यूज कट्टा ब्युरो

भंडारा, ९  नोव्हेंबर  : देशातील नागरिकांचा अतिशय आवडीचा सण  म्हणजे दिवाळी होय. असाच प्रकाश पर्व हा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. हा पाच दिवसांचा सण, उत्सव सर्व राज्यांमध्ये साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर यानिमित्ताने लहान मुले विविध किल्ले बनवित असतात. मात्र लहान मुलांच्या हाताने बनवलेल्या किल्ल्यांचा उल्लेख न करता महाराष्ट्रात दिवाळीची कल्पना करणे निरर्थक मानली जाते.

राज्यातील इतर ठिकाणापेक्षा भंडारा येथेही परंपरेनुसार लहान मुले दर दिवाळीला मोठ्या प्रमाणावर किल्ले बनवित असतात. आता हळूहळू त्याबद्दलचा उत्साह कमी होत आहे असे लक्षात येते. आज परिस्थिती अशी आहे की, जिल्ह्यात काही ठिकाणी लहान मुलांनी दिवाळीत बांधलेले किल्ले दिसतात. किल्ला बांधणे हा नुसता छंद नाही तर शिवाजी महाराजांची किल्ल्याकडे व स्वराज्याकडे कशी रणनीती होती याचाही शोध घेतला गेला पाहिजे.

भंडारा जिल्ह्यत नाशिक, नांदेड, पुणे-ठाणे-मुंबईसारखे किल्ले बनवण्याची समृद्ध परंपरा नाही, मात्र नुतन कन्या विद्यालयातील सेवामुक्त असलेले माजी उपप्राचार्य मोहन दाढी व अन्य काही उत्साही व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक छोट्या हातांनी सुंदर आणि विशाल किल्ले बनवण्याची ऊर्जा त्यांच्यात निर्माण केली.

दिवाळीला किल्ले बांधणे ही केवळ औपचारिकता राहिली नाही, लहान मुलांच्या करमणुकीची गोष्ट नाही तर ते शिवरायांच्या काळातील स्वराज्याचे प्रतीक होते. भंडारा जिल्ह्य़ात लहान मुलांच्या हातात किल्ला बांधण्याच्या अत्यंत समृद्ध परंपरेची बीजे पेरली गेली पाहिजे.

विदर्भात दिवाळीनिमित्त किल्ले बांधण्याची संख्या कमी झाली आहे.

दिवाळीच्या सुट्टया लागल्या व दिवाळी सण जसजसा जवळ येतो तसतसे मुलां -मुलींचे हात किल्ले बांधण्यासाठी उत्साही होतात. दाढी यांच्या घराण्यात किल्ले बनवण्याची परंपरा प्रदीर्घ काळापासून सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडावर दिवाळीचा सण साजरा करण्याची परंपरा किती समृद्ध होती. हे या किल्ल्यावरून सांगितले जाते.

यातून स्वराज्याची झलकही दाखवण्यात आली. जी सध्या नामशेष होत चालली आहे, ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मोहन दाढी सह अनेक नागरिक धडपडत असतात. पुर्वी समृद्ध असलेल्या किल्ला बांधणी कलेला पुन्हा ऊर्जा आणि चैतन्य देऊ इतरांनी सहकार्य करावे. काहींना लहानपणापासूनच किल्ले बांधण्यात, उद्यानांचे संवर्धन करण्यात विशेष रस आहे.

विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाने परिपूर्ण असलेले माजी उपप्राचार्य मोहन दाढी यांनी दिवाळीच्या निमित्ताने भंडारा शहरातच नव्हे तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यात लहान मुलां -मुलींकडून किल्ले बनवण्याची रखडलेली परंपरा पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links