BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

687 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


गडचिरोली

राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन देणार शरद पवार यांना मागणीचे निवेदन

राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन देणार शरद पवार यांना मागणीचे निवेदन

न्युज कट्टा

गडचिरोली,  ९  नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा गडचिरोली च्या वतीने आज गडचिरोली येथे हॉटेल रेणुका येथे जिल्हा कार्यकारिणी ची बैठक राज्य कार्यकारिणी सदस्य श्री प्रवीण भोगे यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीला जिल्हा अध्यक्ष रोशन थोरात, जिल्हा सचिव वैभव चिल्लमवार, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश दासरवार,  जिल्हा सहसचिव सोहन माहूरकर, जिल्हा मूख्य संघटक विष्णू ब्राम्हण, सदस्य रामगिरवार, आसमवार प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत राज्याध्यक्ष शिवराम घोती यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याचे तसेच दिनांक 18 तारखेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गडचिरोली येथे येणार आहेत त्यांना निवेदन देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रवीण भोगे यांनी संघटनेच्या आता पर्यन्त झालेल्या कार्याचा आढावा उपस्थित पदाधिकाऱ्या समोर मांडला तसेच सर्व पदाधिकाऱ्यानी आपआपले मत मांडून या बैठकीची सांगता करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्याचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा गडचिरोली तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links