BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

680 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

माजी खासदार शिशुपाल पटले यांची पुलाच्या बांधकामाला भेट

माजी खासदार शिशुपाल पटले यांची पुलाच्या बांधकामाला भेट

 

न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, 9 नोव्हेंबर

चौंडेश्वरी माता मंदिर मोहाडी समोरील पुलाचे बांधकाम 2019 पासून अतिशय संथ गतीने सुरु असल्याने व अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वर्षभरापासून काम बंद असल्याने गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माजी खासदार शिशुपाल पटले यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्या अनुशंगाने पुलाच्या बांधकाम स्थळाला माजी खासदार शिशुपाल पटले यांनी कार्यकर्त्यांसोबत भेट दिली आणि कामाला त्वरित सुरू करण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनिवर चर्चा केली. लवकरात लवकर पुलाचे बांधकाम पूर्ण करून लोकांसाठी सुरू करण्यात येईल असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
सोबत मुन्ना पुंडे, दिनेश निमकर, जे. टी. निमजे, मतीन शेख, रविकांत देशमुख, टिंकू श्रीपाद, शैलेश गभने, नरेंद्र टीचकुले, रामदयाल पराते, अशोक गभणे, सुभाष भाजीपाले, लोकेश बम्हनोटे व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links