BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

498 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखनी

ग्रीनफ्रेंड्स तर्फे पर्यावरणस्नेही किल्ले बनवा स्पर्धा चे आयोजन

ग्रीनफ्रेंड्स तर्फे पर्यावरणस्नेही किल्ले बनवा स्पर्धा चे आयोजन

लाखनी शहरात तयार झाले आकर्षक शिववैभव किल्ले

स्पर्धा आयोजनाचे लागोपाठ 15 वे वर्ष
 

न्यूज कट्टा ब्युरो / लाखनी, १२  नोव्हेंबर

येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे पर्यावरणस्नेही दिपावली साजरी करण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही आकाशकंदील ,रांगोळी सोबत पर्यावरणस्नेही शिववैभव किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद देत पर्यावरणस्नेही आकर्षक शिववैभव किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. या स्पर्धेला अभा अंनिस तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांनी सहकार्य केले.स्पर्धा आयोजनाचे हे लागोपाठ 15 वे वर्ष होते.

लाखनीचे ज्येष्ठ डॉक्टर दाम्पत्य डॉ. उदय राजहंस व डॉ. प्रतिभा राजहंस यांनी वयाच्या 71 व्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवेल असा अथक उत्साह दाखवीत 20 दिवस अथक प्रयत्न घेऊन तयार केलेला राजगड किल्ल्याची हूबेहुब प्रतिकृती हे लाखनी शहराचे आकर्षण होते.या राजगड प्रतिकृतीद्वारे त्यांनी राजगड किल्ल्याचा 300 वर्षाचा इतिहास व त्यातील घडलेल्या प्रमुख ऐतिहासिक घटनांचा परामर्ष घेतला.त्यांनी अपार मेहनत घेऊन तयार केलेली प्रतिकृती बघायला ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने, ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी सेवानिवृत्त शिक्षक दिनकर कालेजवार,मंगल खांडेकर ,योगेश वंजारी ,किल्ले स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी व लाखनी शहरातील अनेक गणमान्य व्यक्तीनी हा टाकाऊपासुन टिकाऊ प्रकारे तयार केलेला राजगड किल्याचे दर्शन घेतले व शिवाजींच्या पराक्रमाची नोंद स्मरणात ठेवून गेले.

ग्रीनफ्रेंड्स तर्फे आयोजित पर्यावरणस्नेही किल्ला बनवा स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी टाकाऊ वस्तूंचा ,दिवाळीतील फुटलेल्या फटाक्यांचा वापर करीत पर्यावरण संदेश दिला.या स्पर्धेत प्रथम क्रमांक ओंकार मंगल चाचेरे व मंथन घनश्याम चाचेरे यांनी तयार केलेल्या शिवनेरी या किल्ला प्रतिकृतीला देण्यात आला,द्वितीय क्रमांक अर्णव गायधने याच्या तयार केलेल्या काल्पनिक किल्ला प्रतिकृतीला प्राप्त झाला तृतीय क्रमांक श्रीनय मंगल चाचेरे याच्या प्रतापगड प्रतिकृतीला प्राप्त झाला प्रोत्साहनपर क्रमांक मयंक रवी चाचेरे, यश गोपाल लांजेवार व दर्शन भिमेश्वर धारगावे ययांच्या किल्ला प्रतिकृतीला प्राप्त झाला.किल्ला परीक्षण ग्रीनफ्रेंड्स चे कार्यवाह प्रा.अशोक गायधने व पदाधिकारी सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार यांनी केले.

स्पर्धा आयोजनाकरिता सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ मनोज आगलावे,भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक कर्मचारी पतसंस्था मर्यादित भंडाराचे अध्यक्ष संजीव बावनकर, नाना ऑप्टिकल्स, सोना वॉच व इलेक्ट्रॉनिक्स तसेच अशोका बिल्डकाँन चे मुख्य अभियंता रंजनकुमार सिंग,सहाय्यक इंजिनिअर नितेश नगरकर,शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिपेशजी गौतम,मनोज टहिल्यानी,रमेश गभने इत्यादींनी सहकार्य केले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links