BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

701 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखनी

सुंदर दुर्मिळ पक्ष्यांची रांगोळी काढून विद्यार्थ्यांनी दिली सलीम अली यांना आदरांजली

सुंदर दुर्मिळ पक्ष्यांची रांगोळी काढून विद्यार्थ्यांनी दिली सलीम अली यांना आदरांजली
 

न्यूज कट्टा ब्युरो / लाखनी,  १२  नोव्हेंबर

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे भारताचे थोर पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली जयंतीच्या पार्श्वभूमीवर  'पक्षीदिना' निमित्त विद्यार्थ्यांमध्ये दुर्मिळ पक्ष्यांविषयी जाणीव जागृती व्हावी याकरिता 'दुर्मिळ पक्षी रांगोळी स्पर्धा' लाखनी बसस्थानकावर आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला अ.भा. अंनिस तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था जिल्हा शाखा भंडारा (नेफडो) चे सहकार्य लाभले.स्पर्धेच्या सुरवातीला ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब चे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी सर्व उपस्थित स्पर्धकांना पक्षीदिनानिमित दुर्मिळ पक्ष्यांविषयी माहिती व फोटोद्वारे ओळख करून दिली तसेच त्यांचे वैशिष्ट्ये सुद्धा सांगितले.यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे,  ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य पदाधिकारी  सेवानिवृत्त शिक्षक दिनकर कालेजवार ,मंगल खांडेकर,दिलीप भैसारे, निसर्गमित्र पंकज भिवगडे,योगेश वंजारी यांनी सुद्धा स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

यास्पर्धेत लाखनीच्या समर्थ विद्यालय,गांधी विद्यालय,राणी लक्ष्मी कन्या विद्यालय व सिद्धार्थ विद्यालय तसेच माऊली कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.विद्यार्थ्यांनी दुर्मिळ पक्ष्यांची अतिशय सुबकतेने रेखाटने केली.स्पर्धेत प्रथम क्रमांक ओंकार मंगल चाचेरे याच्या 'सारस' या दुर्मिळ पक्षी रांगोळीला व प्रांजल सतीश उईके हिच्या 'करकोचा' पक्षी रांगोळीला प्राप्त झाला तर द्वितीय क्रमांक रोहित अरुण कुंभरे व हिमांशी रविंद्र चाचेरे तसेच गुंजन निकेश बांगळकर याच्या अनुक्रमे 'रंगीत करकोचा' व 'कांड्या करकोचा','शेकाट्या' आणि 'गांधारी' पक्ष्याला प्राप्त झाला.तृतीय क्रमांक श्रीनय मंगल चाचेरे व अनुष्का भिमेश्वर धारगावे  यांच्या अनुक्रमे 'गरुड' व 'सुतार' पक्षी रांगोळीला प्राप्त झाला.चतुर्थ क्रमांक कोमल तिलकचंद नान्हे,यश गोपाल लांजेवार व मनीषा प्रकाश काडगाये यांच्या दुर्मिळ पक्षीरांगोळीला प्राप्त झाला.पाचवा क्रमांक राशी दुर्योधन मांढरे  हिला तर सहावा क्रमांक दर्शन भिमेश्वर धारगावे यांच्या दुर्मिळ पक्षी रांगोळीला प्राप्त झाला.पक्षी रांगोळीचे कोमलचंद गभने,ऋषि वंजारी,दिनकर कालेजवार,मंगल खांडेकर यांनी करून स्पर्धकांच्या कलाकौशल्याचे कौतुक  केले.

दुर्मीळ पक्षी रांगोळी स्पर्धेला साकोली बस आगार व्यवस्थापक गौतम शेंडे ,राष्ट्रीय हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे, अशोका बिल्डकानचे मुख्य अभियंता रंजनकुमार सिंग ,सहाय्यक अभियंता नितेश नगरकर, शिवालय कन्स्ट्रक्शनचे अभियंता दिपेश गौतम ,नाना ऑप्टिकल्स, सोना वॉच व इलेक्ट्रानिक्स तसेच भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी समिती मर्यादित भंडारा चे अध्यक्ष संजीव बावनकर, लाखनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक बी एन डहाके, रमेश गभने,मनोज टहिल्यानी इत्यादीनी सहकार्य केले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links