संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी
न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, ११ डिसेंबर
संताजी वाडँ भंडारा येथे श्री श्रेष्ठ शिरोमणी संताजी जगनाडे महाराजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . ओबीसी क्रांती मोर्चा चे संयोजक जीवन भजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व ओबीसी बाधव बालगोपाल महिलानी संताजी महाराजांना मान वंदना दिली मान वंदना देतेवेळी ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्यसंयोजक अध्यक्ष संजय मते जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थित संत श्रेष्ठींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले महाराजांच्या जयंतीचा आनंद उस्व भंडारा शहरातील मध्य भागी असलेल्या संताजी वाँड येथे साजरा करण्यात आले संत शिरोमणी संताजी महाराज यांची ख्याती मानवतेच्या रक्षणासाठी दिनदुबळ्या हिताचे संदेशासह संत तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखनकर्ते म्हणून जगप्रसिद्ध आहे ओबीसी क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते यांनी जय संताजी जय ओबीसी जयघोषणा केली त्यावेळी जिल्हा अध्यक्षा शोभा बावनकर , कल्पना नवखरे कल्पना चांदेवार शिल्पा गभने यशवंत सुर्यवंशी संजय वाघमारे ,गभने सर तसेच वाडँतील नागरिक बालगोपाल उपस्थित होते .
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'