BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

3354 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

धोक्याची घंटा : भंडारा जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

धोक्याची घंटा : भंडारा जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

- भंडारा वासियांनो, लसीकरण करून घ्या...जिल्हाधिकारींचे आवाहन 

- आठ महिन्यानंतर कोरोनाने मृत्यूची नोंद  

 

न्यूज कट्टा

भंडारा दि.18 डिसेंबर: भंडारा जिल्ह्यात आज कोरोनामुळे एक रुग्ण दगावला असून मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्हयात सहा -सात महिन्यानंतर कोरोनामुळे बाधिताचा मृत्यू झाला आहे. ही धोक्याची घंटा असून प्रशासन सातत्याने नागरिकांना आवाहन करत आहे की त्यांनी लसीकरण करून घ्यावे. योग्य पावले न उचलल्यास कोरोनाचा तीसऱ्या लाटेचा प्रसार होऊ शकतो.

तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर लसीकरणासाठी आग्रही राहिलेल्या आहेत. त्या दृष्टीने व्यापक प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. मात्र कोरोना आता संपला असून आपल्याला काही होणार नाही, या भावनेतून नागरिकांनी वागू नये. कोरोना अद्यापही गंभीर आहे हे आजच्या मृत्युने स्पष्ट केले आहे. तरीदेखील लसीकरणातून संसर्गाला आळा घालू शकतो. अद्यापही ज्यांचे लसीकरणाची डोस प्रलंबित आहेत त्यांनी लसीकरण तातडीने करून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज केले.

मृत व्यक्ती हा विविध आजारांनी ग्रस्त होता. हृदयाच्या व फुफ्फुसा संबंधित व्याधीने ग्रस्त होता. तसेच वय देखील 80 वर्षाच्या जवळपास होते. तसेच खासगी इस्पितळात सात ते आठ दिवस उपचार केल्यानंतर तो आज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. मात्र आज सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

नागरिकांना आवाहन

वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी याच्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने काहीही लक्षण आढळल्यास आधी rt-pcr चाचणी करून घ्यावी. दुखणे अंगावर काढू नये. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो व एकदा खूप जास्त प्रमाणावर वाढल्या नंतर तो नियंत्रित करण्यास कठीण जातो. म्हणून सर्व नागरिकांनी आरोग्यविषयी दक्ष राहून कोणतेही लक्षण आढळल्यास डॉक्टरांकडे जाऊन चाचणी करावी आणि लसीकरण करून घ्यावे ,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links