BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2472 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

मतदार जागृती..ला.ब.शा.चे विद्यार्थी गावखेड्यात

मतदार जागृती..ला.ब.शा.चे विद्यार्थी गावखेड्यात

 

न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, १९ डिसेंबर 

भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत मतदार जागृत व्हावा.मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जगजागृती मोहीम राबवण्यात आली.स्थानिक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातल्या पंधरा विद्यार्थ्यांच्या चमूने भंडारा तालुक्यातील पांढराबोडी,सिर्सी,दाभा, कोथूर्णा या गावात पथनाट्याच्या माध्यमातून जन जागृती केली.सुट्टीचा दिवस आहे म्हणून कुटुंबियांसोबत कुठेतरी सहल आयोजित करणे व मतदान टाळणे,रस्ते, वीज,पाणी,बेरोजगारी,
महागाई हे प्रश्नामुळे मतदानाबद्दल अनास्था मनात घेतलेले मतदार,साडीचोळी,धोतरजोडी,पैसा,धान्य,मतदानासाठी जायला गाडी,अशा प्रलोभनांची वाट पहाणारे मतदार,अशा विविध स्वभावगुणधर्म असणा-या मतदारांचे सुक्ष्म निरीक्षणं या पथनाट्यातून मुलांनी मांडली.जागोजागी विनोदाची पेरणी व यथायोग्य घोषणा,गाणी यामुळे या पथनाट्याने गावोगावी सकाळच्या प्रहरी नागरिकांना खळखळून हसवले.गावबोलीचा प्रभावी उपयोग मुलांनी केला..हातातले कामधाम सोडून गावकरी स्वयंस्फूर्तपणे श्रोता म्हणून उपस्थित झाली.

या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन सौ.स्मिता गालफाडे यांनी केले.पथनाट्य यशस्वितेसाठी गटसाधन केंद्राचे गटसमन्वय सुकराम पडोळे,साधन व्यक्ती राम वाडिभस्मे,नीता भोंगाडे यांनी प्रयत्न केले. 

गटशिक्षणाधिकारी सन्मा. शंकर राठोड साहेब,ला.ब.शा.चे प्रभारी प्राचार्य सुनील खिलोटे, जेष्ठ शिक्षक शरद बडवाईक यांनी पथनाट्य चमूतील कलावंतांचे अभिनंदन केले. या पथनाट्यात मोनाली कनोजे, सानिका फेंडर, युक्ती सेलोकर, वैभवी सेलोकर, सानिया साठवणे, सायली राठोड, श्रुती चोपकर, ऋषिकेश तायवाडे, अमन शर्मा, भावेश शेंडे, क्रिश रामटेके, आर्यन सोनवाणे, मानव निखाडे, तुषार खांदाळे, कांचन कहालकर, शशांक वासनिक या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

हे पथनाट्य सादर व्हावे म्हणून भंडारा च्या तहसीलदार सन्मा. माधुरी लांजेवार मॅडम यांनी फार सकारात्कता दर्शवून त्यांच्या अखत्यारितल्या दोन गाड्या मुलांसाठी उपलब्ध करुन दिल्या त्याबद्दल सौ.स्मिता गालफाडे यांनी आभार व्यक्त केले.

पुस्तकाच्या बाहेरचे जग व अनुभव यामुळे  मुलांमध्ये नेतृत्त्व गुण,आत्मविश्वास, भाषिक कौशल्य,क्षमता  विकसनास हातभार लागतो.

शासनाच्या मतदार जागृती कार्यक्रमामुळे मुलांना हे जग दिसले म्हणून मुलांनी ही गटशिक्षणाधिकारी प्राचार्य महोदयांचे आभार मानले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links