ब्रेकिंग न्युज
तब्बल चाळीस कुटुंबीयांचा मतदानावर बहिष्कार
न्यूज कट्टा / भंडारा, २१ डिसेंबर
मागील ८० वर्षापासून पालोरा येथे वास्तव्यास असलेल्या अतिक्रमण धारकांनी घरकूल नाही तर मतदान नाही अशी भुमिका घेत गावातील ४० कुटूंबांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
के.बी. चौरागडे, सरीता चौरागडे, बाबुजी ठवकर, करडीचे ठाणेदार निलेश वाजे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रीय व उदासीन धोरणामुळे आम्ही शासनाच्या घरकूल योजनेपासून वंचीत असल्याचे सांगितले. गावात एकूण ६० कुटुंब यामुळे प्रभावित आहेत. प्रकरणी मोहाडी तहसिलदार दिपक कारंडे यांना माहिती देण्यात आली असून लवकरच आंदोलन स्थळी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र जो पर्यंत ग्रामपंचायत व तालुका प्रशासन घरकुलाचे ठोस आश्वासन देत नाही. तो पर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असा पेच निर्माण झाल्याने याकडे संपूर्ण ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे. आंदोलकांत रोषाचे वातावरण आहे. आता प्रशासन यावर काय तोडगा काढतोय यावर बरेच काही अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'