BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

3368 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखनी

धक्कादायक ; लाखनी येथील शाळकरी विदयार्थ्याचा ट्रॅक्टर ट्रालीखाली चिरडल्याने मृत्यू

धक्कादायक ; लाखनी येथील शाळकरी विदयार्थ्याचा ट्रॅक्टर ट्रालीखाली चिरडल्याने मृत्यू

 

न्यूज कट्टा ब्युरो / लाखनी , २८ डिसेंबर 

 

शहरात उड्डाणपुलाचे काम जोमात सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात नागरीकांची रेलचेल सुरू असते. नेहमीच वर्दळ सुरू असते. या रहदारींमुळे रस्त्यावर अपघात होवू नये म्हणून वर्दळीच्या ठिकाणी वाहतुक पोलिसांची नेमणुक केली जाते. असे असतानाही एका शाळकरी मुलाचा अपघातात अंत झाल्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा एकदा वाहतूक पोलीसांच्या कर्तव्यनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की , आज दुपारच्या वेळेस लाखनी येथील गांधी विदयालयाचा विदयार्थी शाळा सुटल्यावर घरी परत येताना ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रालीने ने त्याला चिरडत नेले. या अपघातात विदयार्थ्याचा जागीच पार चेंदामेंदा झाला. या घटनेमुळे अपघातस्थळी नागरीकांची गर्दी जमा झाली. लगेच लाखनी पोलीसांनी घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी भेट दिली.

अपघातग्रस्त जागेचा पंचनामा केला व मृताला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. विदयार्थ्याच्या अपघाती मृत्यूमुळे नागरीकांमध्ये वाहतूक पोलीसांच्या हलगर्जीपणाबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. अपघातस्थळी वाहतूक पोलीसांचा चोख बंदोबस्त नसल्यामुळे हा अपघात घडला अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे. तसेच वाजवीपेक्षा जास्त अवजड मालवाहू वाहनांवर कायदेशीर कार्यवाही होत नसल्यामुळे असे अपघात घडतात असे दिसून येत आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links