देशातील नागरिक करणार 75 कोटी सूर्य नमस्कार
न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा,२८ डिसेंबर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्य 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प हा उपक्रम संपूर्ण देशात दिनांक 1 जानेवारी 2022 ते 20 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पतंजलि परिवार, नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशनचे नई दिल्ली, गिता परिवार, हार्टफुलनेश, क्रिडा भारती या व इतर सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालय, फिट इंडिया, भारत सरकारच्या सहयोगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्य 75 कोटी सूर्य नमस्कार घालून भारत मातेला राष्ट्रवंदना करायची आहे. त्याकरिता व्यक्तीकरित्या, शिक्षण, क्रिडा, योग, उद्योग, बॅक, एल आय सी इत्यादी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रकल्प समितीने तयार केलेल्या www. 75 Surya namaskar.com या वेबसाईट वर नोंदणी सुरू झालेली असून आपण नोंदणी करून या महाअभियानात सहभागी व्हावे. दिनांक 1 जानेवारी 2022 ते 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत चालणाऱ्या 51 दिवसीय अभियानातील कुठल्याही 21 दिवसात दररोज 13 सूर्य नमस्कार घालावयाचे आहेत. त्याची नोंद वेबसाईटवर लाॅगिन करून नोंदवावयाची आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत व्यक्तींना देशातील योगक्षेत्रांतील गणमान्य महानुभवांच्या सह्यानिशी ई-सर्टिफिकेट ऑनलाईन प्राप्त होणार आहे.
विद्यार्थ्यांना शारीरीक, मानसिक संतुलन साधण्यासाठी व संस्कार , ऊर्जावान पिढी घडविण्यासाठी तसेच या उपक्रमाद्वारे विश्व पटलावर देशाचे नाव उज्वल व गौरवांवित करण्यासाठी व देशातीय प्रत्येक नागरीक स्वस्थ-समर्थ होण्यासाठी या राष्ट्रीय उपक्रमांत सहभागी होवून या राष्ट्र कार्यात आपले योगदान दयावे असे आवाहन जिल्हा प्रकल्प संयोजक डॉ. रमेश खोब्रागडे, धनजंय बिरणवार, कांचन ठाकरे, गोपाल धोती, रत्नाकर तिडके, विलास केजरकर, मंजूषा डवले, सुनिल भाग्यवानी इत्यादींनी यांनी केले आहे. तसेच अधिक माहीती करिता मो.क्रं. 8208770952, 8668472207, 8446031974, 9960496202 या वर संपर्क साधावे असे विलास केजरकर यांनी कळविले आहे.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'