वीज पडून मुलाचा म्रूत्यू
नवेगाव (धु )येथिल घटना
न्यूज कट्टा ब्युरो / मोहाडी ,२८ डिसेंबर
मोहाडी तालुक्यातील व आंधळंगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवेगाव (धु) येथिल रहिवासी नयन परमेश्वर पुंडे वय ९ वर्ष याचा वीज पडून म्रूत्यू झाला सोबतच एका बैलाचाही म्रूत्यू झाला आणी वडील परमेश्वर सुर्तीलाल पुंडे वय ३५ वर्ष जखमी झाला .ही घटना आज मंगळवारला दुपारी ३ .३० वाजता परमेश्वरच्या स्वतःच्या शेतशिवरात घडली . शाळेला दुपारीच सुट्टी होत असल्याने नेहमी प्रमाणे नयन घरच्या लोकांसोबत स्वतःच्या शेतावर तनीस आणण्यासाठी गेला होता .आज दिवसभर आकाश ढगाळ होता . दुपारी २ वाजेनंतर आकाशात बीजेचा गडगडाट सुरू झाला आणी काही भागात गारपिटीसह पाऊसही आला याच दरम्यान नय न असलेल्या शेतात नयन च्या अंगावर वीज कोसळली आणी होत्याचे नव्हते झाले . त्या ठीकाणी असलेल्या एका बैलाचाही म्रूत्यू झाला .नयनला लगेच आंधळंगाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले . त्याच ठीकाणी नयन ची प्राणज्योत मालवली . नयन हा आनंद प्राथमिक शाळा आंधळंगाव येथे ३ ऱ्या वर्गात शीकत होता . आंधळंगाव पोलीसानी घटना पंचनामा करुन मर्ग दाखल केला व प्रेत शवविच्छेदनासाठी मोहाडी येथिल ग्रामीण रूग्णालयात पाठविले .नयनच्या अचानक म्रूत्यू ने नवेगाव वासियांवर व त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पडवार व त्यान्ची चमू करीत आहे .
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'