अवकाळी पावसामुळे रस्त्यालगतच्या दुकानात शिरले पाणी
न्यूज कट्टा ब्युरो / तुमसर (भंडारा) ,२८ डिसेंबर
दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे कुठे झाडांची पडझड झाली तर कुठे रस्त्यालगतच्या दुकानात पाणी शिरले.
तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाउसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यालगत युएसए विद्यानिकेतन, श्रीराम भवन व अतिथी गृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने नागरिकांची ये-जा करताना दमछाक झाली. तसेच परिसरात रस्त्यावर पाणी साचले असून दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पहायला मिळाले यामुळे एकच तारांबाळ उडाली होती.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'