BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1212 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनाने मृत पावले आहेत त्यांचा शैक्षणिक खर्च नागपूर विद्यापीठ करणार

ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनाने  मृत पावले आहेत त्यांचा शैक्षणिक खर्च नागपूर विद्यापीठ करणार
 

- सीनेट सदस्य, प्रवीण उदापूरे यांनी केले महाविद्यालयांशी संपर्क करण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान
- नागपूर विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय

 

न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, ०६  जानेवरी 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना व्याधिने ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील किव्हा पालक मरण पावले असतील त्यांच्या शिक्षणाचा खर्च विद्यापीठ करेल.

या साठी संबंधित कागद पत्रांसह विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयांशी संपर्क साधावा असे  आवाहन नागपूर विद्यापीठाचे सीनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांनी केले आहे.

नागपूर विद्यापीठ अंतर्गत भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या पीड़ित विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

पालकत्वाचे छत्र हिरावल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले होते. यात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. परंतु हा गंभीर विषय लक्षात आल्याने सीनेट सभेत यावर प्रामुख्याने चर्चा करन्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी या संदर्भात फीस माफी साठी विनंती सुद्धा केली होती. शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सीनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांनी प्रसिद्धि पत्रातुन स्पष्ट केले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links