दारू बंदीसाठी सरसावल्या पालेपेंढरीच्या महिला
महिलांच्या आंदोलनानंतर दारू विक्रेत्यांना अटक
लाखांदुर प्रतिनिधी
न्यूज कट्टा ब्युरो / लाखांदुर, २८ जानेवरी
मागिल पाच ते सहा महिण्यांपासून गावातीलच दोन व्यक्तींकडून अवैद्य रित्या दारू विक्रीचा व्यवसाय केला जात असल्यामुळें गावात नेहमीच मद्यपींकडून धिंगाना केला जायचा, अनेकांचे संसार मोडण्याच्या मार्गावर आले होते. माञ स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैद्य दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलीसांच्या स्वाधिन केले. सदरची घटना गुरूवार (ता.२७) तालुक्यात पालेपेंढरी गावात घडली आहे.
तालुक्यातील पालेपेंढरी या थोट्याशा गावातील नागरिक गुण्या गोविंदाने नांदत असतांना गत पाच ते सहा महिन्यांपासून गावातील बालक कोंडी पिल्लेवान (४०) व सवितराव वसंतराव पिल्लेवान (२७) यांनी गावात अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. गावातच दारू मिळत असल्यामुळें गावात यद्यपी सकाळपासूनच दारू ढोसासचे. दिवसभर गावात कलह व्हायचे अनेकांचे संसार विस्कटण्याच्या मार्गावर आले होते. त्यामुळे गावातील महिला बचट गटांनी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे दारू बंदीची मागणी केली होती. महिलांच्या मागणीनुसार गावच्या सरपंचा वर्षा नरूले यांनी ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत दारू बंदी करीता एकमताने ठराव पारीत करून पालांदुर पोलिसांकडे सादर केला होता. माञ गावातील दारू बंद न होता खुलेआम विक्री व्यवसाय सुरूच होता.
दरम्यान ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून केलेल्या मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे गुरूवारला (ता.२७) गावातील बचत गटाच्या महिला व उपसरपंच भोजराज नान्हे यांनी अवैद्य विक्री करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना गावापासून दीड कि.मी. अंतरावर रंगेहात पकडून स्थानिक ग्रामपंचायत कार्यावर हल्लाबोल आंदोलन केला. या आंदोलनातून महिलांनी दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती.
दारू विक्रेत्यांना पोलीस अटक करीत नाहीत. तोपर्यत आम्ही ग्रामपंचायत कार्यालसासमोरून हलणार नाही असा पविञा महिलांनी घेतला होता. त्यामुळे सरपंच वर्षा नरूले, ग्रामसेविका लिमजे यांनी पालांदुर पोलीसांशी संपर्क साधून तात्काळ येऊन अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार पालांदुरचे ठाणेदार सावंत यांनी घटनास्थळ गाठून दोन पेटी दारू सह दोन्ही दारू विक्रेत्यांना अटक केली आहे.
सदर दारू बंदी मोहिमेत प्रतिमा दिवाकर गजघाटे, मिनाक्षी मस्के, ललिता शिवनकर, सिमा गजघाटे, जयश्री शिवनकर, गावचे उपसरपंच भोजराज नान्हे, लेकराम शिवणकर, योंगेश शिवनकर व आदी महिलांचा समावेश होता.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'