BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

3172 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदूर

कोणाच्या आधारानं जीवन जगू हो!

कोणाच्या आधारानं जीवन जगू हो!
अन पतीच्या आठवणीत हंबरडा फोडला
लाखांदूर येथील बिबट्याच्या हल्ल्यातील मृतकाच्या पत्नीची व्यथा 

अभिमन ठाकरे 

लाखांदूर:-प्रतिनिधी 

न्यूज कट्टा ब्युरो / लाखांदूर, ०१  जानेवरी 

 

कोरोनामुळे लॉकडाऊन झाला अन हातची मजुरी गेली .पोट भरण्यासाठी व पोरीच्या शिक्षणासाठी पैसे कोठून आणाचे म्हणून माझा पती भेटल तो काम करत होते.गॅस महाग झाला म्हणून जंगलातून काड्या आणले जातो मनला अन घरी वापस नाही आले.आता मी कोणाच्या आधारान जीवन जगू हो!अन पतीच्या आठवणीत लाखांदूर येथील बिबट्याच्या हल्ल्यातील मृतक ची पत्नी भावना प्रमोद चौधरी हिने अश्रूंना वाट मोकडी करून दिली.

लाखांदूर लगतच असलेल्या दहेगाव जंगलात ता.27 जानेवारी गुरुवारच्या सकाळी 7 वाजता सरपण जलाऊ काळ्या आणायसाठी दोन सहकारी सोबत प्रमोद चौधरी गेला असता,अचानक बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली होती.लाखांदूर प्लाट येथील रहिवाशी प्रमोद नत्थु चौधरी याचे लाखांदूर-साकोली महामार्गावर सायकल दुरुस्तीची दुकान होती.अशातच कोरोनाने लॉक डाऊन झाला.त्यामुळे सदर दुकान बंद झाली.त्यानंतर महामार्गाचे बांधकाम सुरू झाल्याने त्या जागेवरील दुकान दुसरीकडे हलवावे लागले.मात्र त्या ठिकाणी सायकल दुरुस्त्या करणे जमत नव्हते.म्हणून ते दुकान सध्या पूर्णपणे बंद करण्यात आले होते.तर याच दरम्यान मृतकची पत्नी भावना ही एका अंगणवाडी मध्ये रोजंदारीवर मुलांचे जेवण बनविण्यासाठी जात होती.मात्र कोरोना आला अन शाळा बंद झाल्या त्यामुळे ती रोजी पण बंद झाली.त्यामुळे कुटुंबाचा सर्व भार एकट्या प्रमोद वर आला.तर मृतकला तीन मुली असून शिवानी( 19) व यामिनी(17)ह्या बीएस्सी शिक्षण घेत आहेत.लहान मुलगी पायल (15) ही 10 व्या वर्गात शिक्षण घेत आहे.मृतक हा भूमिहीन होता.त्यामुळे मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.तर मृतक ला 3 भाऊ 3 बहिणी होत्या.यातील 3 भाऊ व एक बहीण मृत्यू पावले आहेत.तर 3 मुलींच्या शिक्षनाचा खर्च कसा करावा व मुलींचे लग्न कसे करावे .असा समस्याचे डोंगर कुटुंबावर पडले आहे.अशा मध्ये मृतक प्रमोद हा हालाकीच्या परिस्थिती मधून जात होता.तर पै पै वाचवून त्याचे नियोजन करीत होता. तर आता घरगुती गॅस महाग झाल्यामुळे प्रमोद हा लाखांदूर जवळच जंगल लागून असल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी जलाऊ लाकूड आणण्यासाठी जंगलात गेला होता.ता.27 जानेवारी ला पहाटे 5.30 ला प्रमोद घरून निघून गेला होता.मात्र घरून जातांना बाहेरून दार लावून निघून मात्र घरच्या लोकांना कुणालाही झोपेतून उठवले नाही.मात्र सकाळी 7 वाजता मृत्यू ची बातमी आली.

आता मी 3 मुलींचा सांभाळ करून शिक्षण व लग्न कसा करावा .मी कुणाच्या आधाराने राहू या आठवणीत भावनाने अश्रूंना वाट मोकडी करून दिली.आणि असा आठवणीतील हंबरडा फोडला.

यात शासन हातभार लावणार  की नाही याकडे कुटुंबीय सह सर्वांचे लक्ष लागून आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links