BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1926 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

‘जुनी पेन्शन’ च्या मुद्द्यावर आज पासून दोन दिवसीय राज्यव्यापी संप

‘जुनी पेन्शन’ च्या मुद्द्यावर आज पासून दोन दिवसीय राज्यव्यापी संप

  • जास्तीत जास्त डिसीपीएस/ एनपीएस धारकांनी संपात सक्रिय सहभाग घ्यावा- राज्याध्यक्ष शिवराम घोती

 

न्यूज कट्टा ब्यूरो

भंडारा, 23 फेब्रुवारी: नोव्हेंबर २००५ पासून सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे २३ व २४ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपाला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन (एनजीपी 5704) यांनी जाहीर पाठिंबा दिल असून सर्व जुनी पेन्शनच्या शिलेदारांना संपात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनात राज्यातील सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होणार आहेत. ‘राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनीच पेन्शन योजना लागू करा, विविध संवर्गातील वेतन त्रुटी दूर करा’ या प्रमुख मागण्या आहेत.

राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ‘जुनी पेन्शन योजना लागू व्हावी’ यासाठी पुकारण्यात आलेल्या दोन दिवसांच्या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सक्रिय सहभाग घेत आहे. दि. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी तसेच तालुका स्तरावर तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री महोदयांना लेखी निवेदन देण्यात येईल. जास्तीत जास्त संख्येने डिसीपीएस/ एनपीएस धारक बंधू भगिनींनी  याप्रसंगी संपात सक्रियरीत्या सहभागी व्हावे असे आवाहन राज्याध्यक्ष शिवराम घोती, राज्य सचिव सचीनकुमार चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष युवराज कलशेट्टी, राज्य कोषाध्यक्ष गजानन टांगले, राज्य सल्लागार तेजराम बांगडकर, भंडारा जिल्हाध्यक्ष नदीम खान, जिल्हा सचिव भूषण फसाटे, जिल्हा कोषाध्यक्ष पंकज बोरकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख कल्याणी निखाडे-तिरपुडे यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links