BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

63 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

ओबीसींचा स्वतंत्र जनगणनेसाठी धडक मोर्चा

ओबीसींचा स्वतंत्र जनगणनेसाठी धडक मोर्चा 
ओबीसी क्रांति मोर्च्याचे भंडाऱ्यात लक्षवेधी आंदोलन

न्यूज कट्टा / भंडारा 

जनगणना 2021 कार्यक्रमात ओबीसी प्रवर्गाची जनगणना करावी या मागणीसाठी शनिवार रोजी ओबीसी क्रांति मोर्चा भंडारा च्या वतीने जिल्हा कचेरीवर धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. मोर्च्यात पाळीव प्राण्यांवरही फलक लावल्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरले.

जनगणना 2021 केंद्र सरकार द्वारे राबविली जात असून 1931 साली झालेल्या जनगणनेत 52 टक्के ओबीसीना 27 टक्के आरक्षण सरकार ने दिले होते. ओबीसी जर मागासवर्गीय आहे आणि संविधानातील व जनगणना कायद्यातील तरतुदी नुसारओबीसीची गणना अपेक्षित आहे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. "सरकार जर ओबीसी चा आकडाच दर्शवत नसेल तर कोणत्या आधारावर सरकार ओबीसीसाठी नियोजन करत आहे," असा प्रश्न संयोजक संजय मते यांनी विचारला.

वारंवार ओबीसी जनगणनेची मागणी सरकार कडे केली गेली परंतु सरकारने ती मागणी डावलली. अश्या परिस्थितीत जनगणना कायदा व संविधानाला अपेक्षित जनगणना प्रश्नावली नमुन्या मध्ये ओबीसीचा कॉलम सरकार ने अंतर्भूत केला नाही, म्हणून आमचा सहभाग नाही असे मोर्च्यात सामील लोकांनी सांगितले. "आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जनगणनेत माहिती देण्यास आमचा नकार आहे," असे युवा नेते पवन मस्के यांनी सांगितले.

याप्रसंगी भंडारा जिल्हा शिवसेना जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ता यांनी धरणे स्थळा वर येऊन जाहिर समर्थन दिले. रिपब्लिकन पँथर संघटनेचे तेजपाल मोर यांनी सुद्धा मोर्च्याला जाहिर समर्थन दिले होते. आदर्श युवा मंच गणेशपूर येथील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मोर्च्यात सामील झाले.
 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links