BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1702 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


अहमदनगर

संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते होणार ‘एटीएम’च्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते होणार ‘एटीएम’च्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन

  • निमंत्रितांचे कवी संमेलन,  कथाकथन, परिसंवाद इत्यादी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
  • राज्यातील अनेक मान्यवर साहित्यिक, शिक्षणतज्ञ राहणार उपस्थित

 

न्यूज कट्टा ब्यूरो

अहमदनगर, दि. 23 फेब्रुवारी: कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (एटीएम) आयोजित दुसरे शिक्षक साहित्य संमेलन दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदनगर येथे संपन्न होत आहे. या शिक्षक साहित्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष पदी बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाचे संपादक, प्रसिद्ध साहित्यिक मा. किरण केंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांची निवड करण्यात आली. साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक मा. दिनकर टेमकर साहेब असतील.

साहित्य संमेलनातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष जिल्हा परिषद बीडचे शिक्षणाधिकारी प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत कुलकर्णी हे राहणार आहेत. कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार व साहित्यिक अनिता येलमटे राहणार आहेत. परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे मा. मनोहर जाधव राहणार आहेत.

या शिक्षक साहित्य संमेलनात ग्रंथदिंडीने सुरुवात होईल. निमंत्रितांचे कवी संमेलन,  कथाकथन, परिसंवाद इत्यादी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ‘एटीएम’चे राज्य संयोजक विक्रम अडसूळ यांनी सांगितले आहे.

या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक मा. गोविंद नांदेडे,  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे सहसंचालक मा. रमाकांत काठमोरे, शिक्षण उपसंचालक पुणे डॉ. वंदना वाहूळ,  शिक्षण उपसंचालक औरंगाबादचे मा. अनिल साबळे,  नाशिकचे शिक्षण उपसंचालक साहित्यिक डॉ. भाऊसाहेब चव्हाण,  ‘एससीईआरटी’ पुणेचे उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे, उपसंचालक मा. विकास गरड, डायट अहमदनगर चे प्राचार्य भगवान खारके,  ‘एससीईआरटी’चे प्रसारमाध्यम उपविभाग प्रमुख डॉ. किरण धांडे,  पुण्याच्या उपशिक्षणाधिकारी डॉ. ज्योती परिहार, सोलापूरच्या उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे,  राहता चे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे,  कर्जतचे गटशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे,  डॉ. राजाभाऊ भैलुमे, सांगलीचे उपजिल्हाधिकारी गणेश मरकड,  नाशिकचे उपजिल्हाधिकारी बबन काकडे,  कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,  अहमदनगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,  अहमदनगरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस,  नागपूरचे शिक्षणाधिकारी अरुण धामणे, लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रसिद्ध कवयित्री तृप्ती अंधारे,  ‘एससीईआरटी’ सामाजिक शास्त्राचे उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण, परभणीचे उपशिक्षणाधिकारी साहित्यिक विठ्ठल भुसारे,  दौंडचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे, नेवासाच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचना पठारे,  आकाशवाणी अहमदनगरचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे,  डॉ.राजाभाऊ भैलुमे, ‘शिक्षणपत्रिका’चे कार्यकारी संपादक प्रदीप निफाडकर, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. विशाल तायडे,  मावळत्या स्वागताध्यक्ष ज्योती बेलवले,  एटीएमचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ, सहसंयोजक ज्ञानदेव नवसरे,  उमेश कोटलवार, संजय खाडे, तुकाराम अडसूळ, लक्ष्मीकांत इडलवार, राहुल आठरे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उपक्रमशील ‘एटीएम’ सदस्य यांची या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links