BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1331 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

कोविड कालावधीत अनाथ झालेल्या अधिकाधिक बालकांना मदत करावी - जिल्हाधिकारी संदीप कदम

कोविड कालावधीत अनाथ झालेल्या अधिकाधिक बालकांना मदत करावी - जिल्हाधिकारी संदीप कदम

·         जिल्हा कोविड कृती दलाच्या कामाचा घेतला आढावा

 

न्यूज कट्टा ब्यूरो  

भंडारा, दि. 22 : कोविड महामारीमध्ये अनाथ बालकांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या जिल्हा कृती दलाने कामाची व्याप्ती वाढवत अधिकाधिक अनाथ बालकांना मदत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, यासह बाल कल्याण समितीच्या माया उके, बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे, चाईल्ड लाईन्सचे प्रतिनिधी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होते. यावेळी अनाथ बालकांना देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाबाबत चर्चा करण्यात आली. मिशन वात्सल्य योजनेचाही आढावा घेण्यात आला. दोन्ही पालक गमावलेल्या 16 बालकांपैकी पंधरा बालकांना आणि 514 अनाथ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती कृती दलाने दिली.

बाल न्याय निधीतील जिल्ह्यासाठी प्राप्त रकमेच्या विनीयोगासाठी वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. रस्त्यावर आढळलेल्या मुलांच्या संदर्भात जानेवारी महिन्यात सर्वे करण्यात आला असून त्यामध्ये आढळून आलेल्यांची माहिती राष्ट्रीय बालस्वराज पोर्टलवर अपडेट करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. याच बैठकीमध्ये जिल्हा बाल संरक्षण समिती व जिल्हा पुनर्वसन समिती यांच्या कामाचा सुद्धा आढावा घेण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links