BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1688 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


युक्रेन

खार्किव गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

खार्किव गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

 

वृत्तसंस्था / न्युज कट्टा ब्युरो, दि. ०२ मार्च

रशिया-युक्रेनमधील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. युक्रेनमधील खार्किव येथे मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन शेखराप्पा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. खार्किवच्या प्रशासनाने यापूर्वीच अशी माहिती दिली होती की, रशियाने या भागातील निवासी भागामध्ये गोळीबार केला. आता या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येतंय.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links