BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2038 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


गोंदिया

गोंदियात 6 वर्षाच्या मुलाची 1 लाख 20 हजारांत विक्री, मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता

गोंदियात 6 वर्षाच्या मुलाची 1 लाख 20 हजारांत विक्री, मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता

पहिल्या पतीपासून झालेला मुलगा दुसऱ्या महिलेला सांभाळ करण्यासाठी देऊन स्वत: दुसरे लग्न करणारी आई दोन वर्षांनंतर आपल्या मुलाची विचारपूस करण्यास गेली

 

 न्यूज कट्टा ब्युरो / गोंदिया, ११  मार्च 

 

गोंदियात सहा वर्षाच्या मुलाची 1 लाख 20 हजार रूपयात विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी गोंदिया शहर पोलीसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून मुलांची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

मुलांची विक्री करणारे मोठे रँकेट सक्रीय

पहिल्या पतीपासून झालेला मुलगा दुसऱ्या महिलेला सांभाळ करण्यासाठी देऊन स्वत: दुसरे लग्न करणारी आई दोन वर्षांनंतर आपल्या मुलाची विचारपूस करण्यास गेली. ज्या महिलेकडे आपला मुलगा दिला, तिच्याजवळ आपला मुलगाच नाही, अशी खात्री पटताच आईने गोंदिया शहर पोलिसात धाव घेतली. गोंदिया पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असता त्या 6 वर्षांच्या मुलाची 1 लाख 20 हजार रुपयात भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याची बाब पुढे आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून मुलांची विक्री करणारे मोठे रँकेट सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या

गोंदियातील एका माहिलेने पहिल्या पतीपासून असलेल्या मुलाला 2020 मध्ये गोंदियातील मंगला उर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे हिच्याकडे सांभाळायला दिले होते. मंगला चंद्रिकापुरे हिने त्या महिलेचे लग्न जळगावच्या चारडी येथील एका इसमाशी लावून दिले. तुझ्या मुलाचे मी संगोपन करेन, असे तिने इंदूला म्हटले होते. मंगलावर विश्वास ठेवून दुसरे लग्न करणारी इंदू मुलाच्या भेटीसाठी 22 फेब्रुवारी 2022 रोजी गोंदियात आली असता आरोपी मंगलाकडे तिचा मुलगा नव्हता. तिने मुलासंदर्भात विचारपूस केली. त्यावेळी तिने उत्तर दिले नाही. माझ्या मुलाचे अपरहण झाले असावे किंवा त्याची विक्री झाली असावी, असा संशय घेऊन त्या आईने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली. गोंदिया पोलिसांनी  भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links