आमदार विक्रम काळे यांची नूतन कन्या परीक्षा केंद्राला भेट
न्यूज कट्टा ब्यूरो
भंडारा, दिनांक 26 मार्च: राज्याचे शिक्षक आमदार आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाचे सदस्य विक्रम काळे यांनी नुकतीच नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय भंडारा येथे आकस्मिक भेट देऊन परीक्षा केंद्राचे निरीक्षण केले.
कला व वाणिज्य शाखेचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना माननीय आमदारांनी भेट दिली. भेटीदारम्यान त्यांनी वर्गांत जाऊन पाहणी केली आणि केंद्र संचालक उपमुख्याध्यापिका निलू तिडके व पर्यवेक्षकांशी संवाद साधला तसेच शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. परीक्षा केंद्रावर मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरळीत परीक्षा पार पडत असल्याबद्दल माननीय आमदार यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संगठनचे जिल्हाध्यक्ष नदीम खान यांनी जुनी पेन्शन संदर्भात चर्चा केली असता सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी विधीमंडळात वारंवार प्रश्न मांडून जुनी पेन्शन लागू होत नाही तिथपर्यंत पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार विक्रम काळे यांनी दिले.
याप्रसंगी पथकातील महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष खेमराज कोंडे, नागपूर विभागीय कार्याध्यक्ष देवेंद्र सोनटक्के, उपाध्यक्ष अशोक काणेकर, प्रदिप राठोड उपस्थित होते.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'