नूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान
न्यूज कट्टा ब्यूरो
भंडारा, दि. 25 मार्च: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून भंडारा सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकतेच सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आले.
सायबर क्राइम बाबत जगजागृती करीत असताना सायबर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी सोशल मीडिया हाताळताना तसेच ऑनलाइन खरेदी, इंटरनेट मोबाइल व्यवहार, येणारे फेक कॉल, फेक लॉटरी मेसेज, हनी ट्रैप, लहान मुलांची फ्री फायर गेम याबाबत कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली.
याप्रसंगी नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. निलू तिडके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तर शिक्षिका सौ. सुषमा कुरंजेकर यांनी आजच्या युगात महिला सशक्तीकरण यावर मार्गदर्शन केले. सायबर पोलीस स्टेशन चे पोलिस हवालदार गौतम राऊत, नाईक स्नेहल गजभिये, वैभव चामट, राज कापगते यांनी विद्यार्थी, शिक्षक यांना सायबर क्राइम बद्दल मार्गदर्शन केले तसेच अपराध घडू नये याबाबात क़ाय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. जयश्री केळवदे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. विभा नानोटी यांनी केले.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'