BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

932 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

विभागात भंडारा दुसऱ्या स्थानी, यंदाही मुलींची सरशी

विभागात भंडारा दुसऱ्या स्थानी, यंदाही मुलींची सरशी

न्यूज कट्टा/ भंडारा, 8 जून:

जिल्ह्याचा निकाल 97.30 टक्के
कोरोना काळात तब्बल दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे मार्च 2022 मध्ये गृह केंद्रांवर घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत भंडारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी बजावत 97.30 टक्केवारी नोंदवून नागपूर विभागात दूसरा येण्याचा मान मिळविला आहे. विशेष म्हणजे याहीवर्षी जिल्ह्यात मुलीच सरस ठरल्या असून त्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 98.19 असून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 96.46 आहे.

विज्ञान शाखेत जिल्हा नागपूर विभागात अव्वल
भंडारा जिल्ह्यातून मार्च 2022 उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला एकूण 17690 विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले मात्र प्रत्यक्षात 17627 विद्यार्थी उपस्थित राहिले, त्यापैकी 17152 विद्यार्थी सुखरूप उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याची विज्ञान शाखेची टक्केवारी 99.60 असून नागपूर विभागातून सर्वोत्कृष्ट आहे.  सोबतच व्यावसायिक (एमसिविसी) आणि तांत्रिकी (आयटीआय) शाखेत 100 टक्के घेऊन जिल्हा नागपूर विभागात प्रथम आहे. जिल्ह्याची कला शाखेची टक्केवारी 94.58 आणि वाणिज्य शाखेची टक्केवारी 97.81 टक्के असून दोन्ही शाखांत जिल्हा नागपूर विभागात द्वितीय स्थानावर आहे. तांत्रिक (आयटीआय) शाखेत जिल्ह्यातून दोन कनिष्ठ महाविद्यालयातील फक्त एकेकच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ही विशेष.

तालुकानिहाय कामगिरीत साकोली अव्वल
तालुकानिहाय कामगिरीत साकोली तालुक्याने प्रथम क्रमांक पटकाविला असून साकोली तालुक्याचा निकाल 98.46 टक्के आहे. त्यापाठोपाठ भंडारा तालुका 98.24 टक्के, तुमसर तालुका 97.79 टक्के, लाखनी तालुका 97.73 टक्के, मोहाडी तालुका 97.10 टक्के, लाखांदूर तालुका 95.77 टक्के तर पवनी तालुक्याचा निकाल 94.32 टक्के आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक 4617 '' विद्यार्थ्यांनी भंडारा तालुक्यातून परीक्षा दिली. जिल्ह्यातून एकूण 92 विद्यार्थ्यांनी '' परीक्षा दिली असून त्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.56 आहे तसेच एकूण 78 विद्यार्थ्यांनी 'आईसोलेटेड' (व्यक्तिगत) परीक्षा दिली असून त्यांपैकी कुणीही उत्तीर्ण होऊ शकले नाही.

जिल्ह्यात 60 कनिष्ठ महाविद्यालये 100 टक्के
जिल्ह्यातील एकूण 161 कनिष्ठ महाविद्यालयांपैकी यंदा तब्बल 60 कनिष्ठ महाविद्यालयांनी 100 टक्के निकाल दिला असून मागील कित्येक वर्षांपेक्षा ही संख्या जास्त आहे. भंडारा तालुक्यातील 35 पैकी 16, लाखनी तालुक्यात 25 पैकी 11, तुमसर तालुक्यात 25 पैकी 11, साकोली तालुक्यात 21 पैकी 9, पवनी तालुक्यात 20 पैकी 6, मोहाडी तालुक्यात 20 पैकी 4 तर लाखांदूर तालुक्यात 15 पैकी 3 कनिष्ठ महाविद्यालयांनी 100 टक्के निकल नोंदविला आहे.

नूतन कन्या च्या चिन्मयी चंद्रकांत बालपांडे विज्ञान शाखेत, कीर्ती कुवरलाल दमाहे कला शाखेत जिल्ह्यात प्रथम, तनिशा सेलोकर वाणिज्य शाखेत जिल्ह्यातून द्वितीय 
वृत्त लीहेपर्यंत नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालायची चिन्मयी चंद्रकांत बालपांडे विज्ञान शाखेत 600 पैकी 562 गुण आणि 93.67 टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. तिला इंग्रजी 84, गणित 97, भौतिकशास्त्र 94, रसायनशास्त्र 100, जीवशास्त्र 93 आणि माहिती तंत्रज्ञान 94 गुण आहेत. याच नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालायची कीर्ती कुवरलाल दमाहे 600 पैकी 519 गुण आणि 86.50 टक्के घेत कला शाखेत जिल्ह्यातून प्रथम आली आहे. तिला इंग्रजी 89, मराठी 72, भूगोल 87, समाजशास्त्र 89, अर्थशास्त्र 84, अन्नशास्त्र तंत्रज्ञान 98 गुण आहेत. वाणिज्य शाखेतून तनिषा लक्ष्मण सेलोकर 600 पैकी 565 गुण 94.17 टक्के घेत जिल्ह्यातून द्वितीय आली आहे. सर्व स्तरावरून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींच कौतुक होत आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links