BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

198 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा 

लोक अदालतीनंतर ६ न्यायाधीशांना कोरोनाची लागण 

लोक अदालतीनंतर ६ न्यायाधीशांना कोरोनाची लागण 
न्यायालयाचे कामकाज काही दिवस ठप्प 
न्यूज कट्टा / भंडारा 
१२ डिसेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीनंतर भंडारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह इतर  पाच न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. 

या सहा न्यायाधीशांपैकी एका न्यायाधीशांना नागपूर येथे हलविण्यात आले असून तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच दोन न्यायाधीशांना होम कॉरंटाईन करण्यात आले असून इतर तीन न्यायाधीशांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लोक अदालातीच्या वेळी हजर असलेले इतर कर्मचारी आणि पक्षकार यांचीही चाचणी सुरु आहे. 

पुढील काही दिवस न्यायालयाचे कामकाज ठप्प राहणार असुन लवकरात लवकर न्यायालयीन कामकाज सुरु व्हावे अशी मागणी सर्व वकिलांमार्फत केली जात आहे. 
निनाद बेदरकर, वरिष्ठ अधिवक्ता 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links