नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार !
भाजपाचे राज्य महामंत्री सुधाकर दिवे यांचे प्रतिपादन
न्यूज कट्टा / भंडारा
केन्द्र सरकारने पारित केलेले नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असुन त्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच होईल तसेच या नव्या कायद्यांमुळे शेतकरी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवू शकतील असे प्रतिपादन भाजपाचे महाराष्ट्र राज्य महामंत्री सुधाकर दिवे यांनी केले. भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्ह्याद्वारे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
केंद्र सरकारने नुकतेच पारित केलेले तीन कृषी कायदे हे शेतकरी हिताचेच आहेत, मात्र विरोधी पक्षाद्वारे या नव्या कायद्यांबाबत गैरसमज पसरवून आंदोलन करण्यात येत आहे. हे कायदे शेतकरी विरोधी असल्याचे विरोधी पक्षाद्वारे सांगण्यात येत आहे. मात्र हे शेतकरी कृषि कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी असुन त्यांना याचा फायदा होईल व यामुळे शेतकरी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवू शकतील असे सुधीर दिवे यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्ह्याध्यक्ष प्रदीप पडोळे, खासदार सुनील मेंढे, जिल्हा महामंत्री हेमंत देशमुख, मुकेश थानथराटे,मुन्नाजी पुंडे, भंडारा शहर अध्यक्ष संजय कुम्भलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'