BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

175 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायत निवडणुक रणसंग्रामाला सुरुवात

जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायत निवडणुक रणसंग्रामाला सुरुवात

ग्रामपंचायत निवडणुकीने गावांच्या अर्थकारणाला चालना   

 

न्यूज कट्टा / भंडारा 

 

एप्रिल ते जून या महिन्यात मुदत संपलेल्या  जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची घोषणा होतात आचारसंहिता लागू झालेली आहे.  एप्रिल ते जून या महिन्यात मुदत संपली होती मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूक घेणे शक्य नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती.

भंडारा तालुक्यात सर्वाधिक 35 ग्रामपंचायत
निवडणूक आयोगाने घोषणा केलेल्या भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायती पैकी भंडारा तालुक्यातील सर्वात जास्त म्हणजे 35 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यानंतर पवनी तालुक्यातील 27, लाखनी तालुक्यातील 20, साकोली तालुक्यातील 20, तुमसर तालुक्यातील 18, मोहाडी तालुक्यातील 17 आणि लाखांदूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

15 जानेवारीला मतदान तर 18 ला  मतमोजणी
ग्रामपंचायत निवडणुकीची नोटीस तहसीलदार 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहेत. 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. 15 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता पासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीसह सरपंच पदाचे आरक्षणही जाहीर
भंडारा जिल्ह्याच्या 541 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण ही काल जाहीर करण्यात आले. 541 ग्रामपंचायती पैकी 271 सरपंचपद हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती साठी 90 पैकी 45 महिलांसाठी, तर अनुसूचित जमातीच्या 43 पदांपैकी 22 महिलांसाठी, नागरीकांचा मागास प्रवर्ग 146 पदांपैकी 73, महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गातील 262 पदांपैकी 131 महिलांकरिता सरपंचपद आरक्षित असणार आहे. यामध्ये तुमसर तालुक्यातील 97 , मोहाडी तालुक्यातील 76, भंडारा 94, पवनी 79, साकोली 62, लाखनी तालुक्यातील 71 आणि लाखांदूर तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेसाठी ही रंगीत तालीम आहे
भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीचे कार्यकाळ संपले असून कोरोनामुळे निवडणूक थांबलेली आहे. त्यामुळे येथेही प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होईल, असे वाटत असल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय नेते आणि इच्छुक कामाला लागले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या पहिले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक लढविणार्‍या राजकीय पक्षांसाठी आणि नेत्यांसाठी रंगीत तालीम ठरणार आहे.

 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links