तब्बल तेरा वर्षांनंतर वेडसर महिलेची घरच्यांशी भेट
महिला व बाल विकास अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटरचा पुढाकार
न्यूज कट्टा / कविता मोरे नागापूरे
वेडसरपणाच्या भरात घरून निघून गेलेल्या महिलेची तिच्या कुटुंबियांशी तब्बल तेरा वर्षानंतर भेट घडून आली. भंडारा जिल्ह्यातील महिला व बाल विकास अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटरच्या पुढाकाराने या महिलेला तिच्या मुलीला भेटता आले.
मागील काही वर्षांपासून भंडारा शहरातील दुर्गा माता मंदिर, मोठा बाजार परिसरात एक 55वर्षीय वेडसर महिला घर करून राहात होती. परिसरातील नागरिकांना ती कधी शिवीगाळ करायची त्यामुळे नागरिकही तिला त्रास द्यायचे. अनेकदा रात्रीच्या वेळी काही मद्यपी तिची छेड काढत असत. परिसरातील काही दक्ष नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासनात यांना या बाबत माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार, केंद्र प्रशासक मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनात सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी व मोहुर्लेने यांनी स्वतः या महिलेची भेट घेतली. तिची आपुलकीने विचारपूस केली आणि तिला सेंटरला दाखल करण्यासाठी आणण्यात आले. एक दि Read more »
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'