BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

सिटीझन जर्नालीझ्म 'CJ कट्टा'

कमांडो ग्रूप गोपीवाडा शहापुर तर्फे भोजनदान 

न्यूज कट्टा / भंडारा,२२ मे 

कमांडो ग्रूप गोपीवाडा शहापुरच्या वतीने भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कोव्हीड ब्लॉक मध्ये काम करणारे सफाई कामगार तसेच  डॉक्टर आणि नर्स  यांना १८ मे रोजी सायंकाळी भोजन व बिस्कीट वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत कमांडो ग्रूप गोपीवाडा शहापुर यांनी एक हात मदतीचा म्हणून भोजन दानाचे कार्य केले आहे. 
कमांडो ग्रूप गोपीवाडा शहापुरचे मुख्य मार्गदर्शक व माजी सैनिक चंद्रशेखर डोळस यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्य  करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक माजी सैनिक चंद्रशेखर डोळस, मार्गदर्शक राजेंद्र सेलोकर, कमांडो गृप सदस्य आदेश कानतोडे,आकाश भोंदे, साहिल राऊत ,रितीक देवगडे, कुणाल कोरे, शुभम गाहाने, अंशुल झळके, गायत्री शेंडे, शेया शेंडे, मुस्कान त्रिवेदी, आदि कमांडो ग्रूपचे सदस्य उपस्थितीत होते.

Read more »

RECENTS NEWS

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'